जयभवानी रोडला घरफोडीत गृहोपयोगी वस्तूंची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 00:31 IST2016-01-06T00:25:38+5:302016-01-06T00:31:52+5:30
जयभवानी रोडला घरफोडीत गृहोपयोगी वस्तूंची चोरी

जयभवानी रोडला घरफोडीत गृहोपयोगी वस्तूंची चोरी
नाशिक : नाशिकरोड परिसरातील जयभवानीरोड परिसरात एका बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे़
खोले मळ्यातील रहिवासी मंगला चंद्रकांत नायर या २१ नोव्हेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत मुंबईला कुटुंबासह फिरण्यासाठी गेल्या होत्या़ मुंबईहून परतल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला व घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले़ तसेच चोरट्यांनी घरातील एलसीडी टीव्ही, टॅब, मोबाइल फोन, डीव्हीडी प्लेअर असा ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे लक्षात आले़ नायर यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन फिर्याद दिली़ त्यानुसार उपनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)