नाशिक : गंगापूररोड भागातील आनंदवल्ली शिवनगर येथील बंद अवस्थेतील इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापर महावितरण कार्यालयातील आशिष मच्छींद्र पोरजे (२३, रा. गंगापूर) यांनी ट्रान्सफार्मची चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार २६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी हा ट्रान्सफार्मर चोरल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
आनंदवल्ली भागातून इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 01:38 IST