चालकांचा जबरी चोरीचा बनाव
By Admin | Updated: August 19, 2016 00:12 IST2016-08-19T00:12:39+5:302016-08-19T00:12:39+5:30
चांदवड : पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने घटना उघडकीस

चालकांचा जबरी चोरीचा बनाव
चांदवड : पोलीस स्टेशनला ट्रक चालकाने अज्ञात इसमानी एक लाख रुपये चोरुन नेल्याची तक्रार केली़ अवघ्या २४ तासाच्या आत याचा पर्दापाश चांदवड पोलिसांनी करून तक्रारदाराचा बनाव उघडकीस आणला़
बुधवार दि. १७ रोजी समाधान सिताराम पाटील ( ३६) रा. वाघड ता. चाळीसगाव यांनी हिवरखेडे शिवारात आयशर ट्रक क्रमांक एम.एच. २० / सी.टी. २२७७ ने चाळीसगाव कडे जात असतांना हिवरखेडे येथे ओमनीतुन चार इसमानी मारहाण करुन एक लाख रुपये चोरुन नेल्याची माहिती दिली. सदरची घटनेची माहिती चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मिळताच त्यांनी नाकाबंदी लावली़ असता हिवरखेडे येथील ग्रामस्थांनी लुटमारीचा प्रकार घडणे शक्यच नाही असे सांगीतल्याने तर चालक समाधान पाटील यांचे अंगावर मारहाणीचे जखमा दिसून आल्या नाहीत. तसेच त्याचा भ्रमणध्वनी चोरट्यांनी चोरुन नेला नाही. तसेच त्याने घटनेचे वेळी आरडाओरड केली नाही. अगर रोडवरील कोणत्याही इसमांना पेट्रोल पंप व इतर ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. परंतु कोठेही काळ्या ओमनी दिसून आली नाही. केली व्यापारी गुप्ता यांचेकडे फोन वरुन माहिती घेतली असता त्याने १ लाख १३ हजार ५०० रुपये चालकाजवळ दिल्याचे व एका पिशवीत बांधुन दिल्याचे सांगीतले. प्रत्यक्षात एक लाख रुपये वेगळे व १३५०० रुपये वेगळे ठेवल्याने चालकाने सांगीतले.या सर्व विसंगती मुळे तपासाची दिशा चालकांकडे वळु लागली व पोलीस निरीक्ष क अनंत मोहिते यांना संशय येऊ लागला. त्यांनी घटनेची माहिती पोलीस अधिक्षक ग्रामीणचे अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधिक्षक डॉ. राहुल खाडे यांनी मार्गदर्शन केल्याने निरीक्षक अनंत मोहिते , सहाय्यक निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस निरीक्षक कैलास चौधरी , मंगेश डोंगरे, चालक मोरे यांनी तपास केला़ (वार्ताहर)