पोलीस निरीक्षकाच्या पिस्तुलासह काडतुसांची चोरी
By Admin | Updated: March 25, 2016 23:45 IST2016-03-25T23:00:43+5:302016-03-25T23:45:28+5:30
पोलीस निरीक्षकाच्या पिस्तुलासह काडतुसांची चोरी

पोलीस निरीक्षकाच्या पिस्तुलासह काडतुसांची चोरी
इंदिरानगर : येथील श्रीजयनगरमधील राहणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या घरी झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सरकारी पिस्तुलासह दहा जिवंत काडतुसांसह रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी (दि़२५) उघडकीस आला़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीजयनगर अपार्टमेंटच्या सी विंगमधील फ्लॅट क्रमांक तीनमध्ये वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुहास मधुकर राऊत हे कुटुंबीयांसह राहतात़ औरंगाबाद येथे परीक्षेसाठी गेलेल्या राऊत यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते़ गुरुवारी (दि़ २४) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली ५० हजार रुपये किमतीची सरकारी पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे व अठरा हजार पाचशे रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)