चंदनाच्या झाडांची चोरी

By Admin | Updated: August 21, 2016 00:35 IST2016-08-21T00:22:59+5:302016-08-21T00:35:30+5:30

सायखेडा : पोलिसात गुन्हा दाखल

Theft of Candal Plants | चंदनाच्या झाडांची चोरी

चंदनाच्या झाडांची चोरी

 निफाड : तालुक्यातील सायखेडा येथे अज्ञात चोरट्यांनी तीन चंदनाच्या झाडांची चोरी केली.
सायखेडा शिवारात राधाकिसन कायस्थ यांच्या शेतात पाच चंदनाची झाडे आहेत. ती रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोडली. त्यातील तीन झाडे घेऊन चोरटे पसार झाले तर दोन झाडे शेतातच तशीच सोडून देण्यात आली आहे. सचिन कायस्थ हे आपल्या शेतात चक्कर मारायला गेले असता चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचे आढळले. याबाबत त्यांनी वडील राधाकिसन कायस्थ यांना चोरीबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दिला आहे. चंदन चोरांचा तपास करण्याची मागणी कायस्थ यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Theft of Candal Plants