नांदूर शिवारात बैलजोडीची चोरी
By Admin | Updated: October 12, 2014 21:47 IST2014-10-12T01:15:41+5:302014-10-12T21:47:32+5:30
नांदूर शिवारात बैलजोडीची चोरी

नांदूर शिवारात बैलजोडीची चोरी
नाशिक : नांदूर शिवारातील एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ पेठ मार्केट शेजारी राहणारे सुशील आत्माराम गुरव (३९) यांचा नांदूर शिवारात गुरव फार्म आहे़ या ठिकाणी असलेले त्यांचे ३० हजार रुपयांचे दोन बैल चोरट्यांनी चोरून नेले़ याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़