शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

१५ लाखांच्या लोखंडी सळ्यांच्या चोरीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:35 IST

मुंबईच्या एका स्टील व्यावसायिकाची फसवणूक करत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या सिन्नर येथून भिवंडीला पोहचविण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता.

नाशिक : मुंबईच्या एका स्टील व्यावसायिकाची फसवणूक करत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या सिन्नर येथून भिवंडीला पोहचविण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत गौळाणे रस्त्यावरून लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रेलरसह चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीतून भिवंडी येथील एका बांधकाम प्रकल्पावर वाहून नेणाऱ्या लोखंडी सळ्यांचा ट्रेलर अचानकपणे मार्ग बदलवून दुसºया ठिकाणी घेऊन गेल्याचे उदय ट्रान्सपोर्टचे उदयसिंग यांच्या जीपीएस तंत्रज्ञानामुळे लक्षात आले. त्यामुळे सिंग यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर (एमएच ४३ बीजी ६८८२) चोरी झाल्याची फिर्याद दिली. संशयित ट्रेलरचालक राजन सिंग, व्यावसायिक निसार खान उर्फ प्रधान व त्याचे चार मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा छडा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, रवींद्र सहारे, विजय लोंढे, राजाराम वाघ, रमेश घडवजे, देवकिसन गायकर आदींच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिसरात पाहणी केली. यावेळी गौळाणे शिवारात काही अज्ञात लोक ट्रेलर उभा करून लोखंडी सळ्या उतरवित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने अब्दुलअहद मुस्तुफा खान (४२, रा. प्रशांतनगर, पाथर्डीफाटा), वकील मुस्लीम खान (३५), ध्रुपराज रामबरान यादव (२०), अल्लाऊद्दीन अय्युब खान (२४, तिघे रा. अंबड लिंकरोड, मूळ उत्तर प्रदेश) यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.नागरे-पाटील यांनी दिली ‘रॅकेट’ माहितीशहरातून लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाºया ट्रेलरचालकांना हाताशी धरून संशयित चोरट्यांची टोळी निर्जन ठिकाणी ट्रेलरमधून लोखंडी सळ्या उतरवून चोरी करत असल्याची माहिती प्रथम पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखा युनीट-२च्या पथकाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देऊन नवा ‘टास्क’ दिला. पथकाने हा टास्क यशस्वीरीत्या पार पाडत लोखंडीसळ्या चोरी करणाºया चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय