नाट्यरसिक एकांकिका महोत्सव २९ला रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:30+5:302021-02-05T05:46:30+5:30
नाशिक : नाट्यरसिक आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यरसिक एकांकिका महोत्सव शुक्रवारी (दि.२९) कालिदास कलामंदिर येथे ...

नाट्यरसिक एकांकिका महोत्सव २९ला रंगणार
नाशिक : नाट्यरसिक आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यरसिक एकांकिका महोत्सव शुक्रवारी (दि.२९) कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ५ ते ९ या वेळेत रंगणार आहे.
कोरोनामुळे ऑनलाइन चालणाऱ्या तालमींमधून तयार झालेल्या एकांकिकांचे ऑफलाइन सादरीकरण असे वैशिष्ट्य असलेला हा नाट्यमहोत्सव ठरणार आहे. यंदा नाट्यरसिकचे सदस्य असलेले लेखक कै. नरेंद्र विश्वनाथ सोनवणे यांना हा महोत्सव समर्पित करण्यात येणार आहे. नाशिकमधील विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार या निमित्ताने एकसंघ होऊन या महोत्सवाचे आयोजन करत आहेत. सध्या सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील कलाकार पूनम पाटील व उमेश दामले यांनी साकारलेली एकांकिका या महोत्सवात विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रदीर्घ काळाने होत असलेल्या एकांकिका महोत्सवाचा आनंद विनामूल्य अनुभवावा, असे आवाहन संयोजकांतर्फे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सहकार्यवाह राजेश जाधव यांनी केले आहे. या महोत्सवात बासुंदी, मृगजळ, सेम टु सेम, दुकान कुणी मांडू नये, या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले.