शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार

By अझहर शेख | Updated: October 29, 2022 10:15 IST

शुक्रवारी मध्यरात्री घडली ही घटना.

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार (दि.२८) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसले होते. त्याच वेळी अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. यावेळी त्याचे वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव यांच्या डोक्यात वार केला. दरम्यान या ठिकाणाहून अक्षय समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला. दरम्यान गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयला त्या ठिकाणी त्यांनी गाठले आणि त्याच्या डोक्यात पुन्हा कोयत्याने जबरी वार केले. तसेच त्याच्या डोक्यात दगड उचलून टाकला. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी राहिवाशाने अक्षयला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांकडे असलेले हत्यार बघून भीतीने त्याने पळत पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान त्याने अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता अंबड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी जखमी अक्षय जाधव यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पोलीस गाडीत बसवून जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी अक्षयला तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान या प्रकरणी संशयित मारेकरी तन्मय गोसावी व आकाश साळुंखे हे फरार होण्याच्या तयारीत असताना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांना सापळा रचून तात्काळ अटक केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

नुकताच सुटला होता जामीनावरया घटनेतील मृत अक्षय उत्तम जाधव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल असून नुकतेच त्याला व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी ३२ तोळे सोने व साडेदहा लाख रुपये रोख असा घरफोडीचा मुद्देमाल जप्त केला होता. अक्षय हा ८ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथून जामिनावर सुटला होता. त्याच्या विरोधात यापूर्वी अंबड पोलीस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. यापूर्वी २६ डिसेंबर २०२० ते २५ जून २०२१ पर्यंत सहा महिन्याच्या कालावधीसाठी त्याला जिल्ह्यातून हद्दपार देखील करण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी