शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची कासवगती, एनकॅपचा निधी खर्च करणार कधी?

By suyog.joshi | Updated: June 8, 2024 15:10 IST

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा अर्थात एनकॅप योजनेंतर्गत महापालिकेला मागील चार वर्षांत ८७ कोटींचा निधी दिला आहे...

 एनकॅपच्या निधीसाठी केंद्र सरकारने महापालिकेला जूनअखेर ४५ टक्के खर्च करणे बंधनकारक राहील, असा अल्टिमेटम दिला असून, शुक्रवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात हा आदेश देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त अशोक करंजकर, पर्यावरण उपायुक्त अजय निकत यांची प्रमुख उपस्थिती हाेती.केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा अर्थात एनकॅप योजनेंतर्गत महापालिकेला मागील चार वर्षांत ८७ कोटींचा निधी दिला आहे. मात्र, सबंधित विभागांकडून त्यापैकी अवघा २३ कोटी ४२ लाख रुपये निधी खर्च झाला. याबाबत केंद्र सरकारने तीव्र नाराजी दर्शवली असून, चालू जून महिना अखरेपर्यंत एकूण निधीच्या ४५ टक्के रक्कम खर्च करावा, असा अल्टिमेटम दिला आहे. केंद्रांच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात ‘एनकॅप’ योजना राबविली जात आहे. त्यामध्ये देशातील शंभर शहरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नाशिक शहराचा समावेश आहे. सन २०२० पासून या योजनेंतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी महापालिकांना वर्षाला वीस कोटी रुपयांचा निधी दिला जातो. मनपाला मागील चार वर्षांत ८७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला, परंतु एवढा मोठा निधी प्राप्त होऊनही मनपाकडून विविध योजनांसाठी कासवगतीने निधी खर्च केला जात आहे. मागील चार वर्षांत अवघा २३ कोटी ४२ लाखांचा निधी खर्च होऊ शकला. हे प्रमाण अवघे ३५ टक्के आहे. त्याची गंभीर दखल केंद्राने घेतली असून, जूनअखेरपर्यंत आणखी दहा टक्के निधी खर्च झाला पाहिजे, अशी तंबी दिली आहे.पाच कोटींची कपातकेंद्राकडून दरवर्षी वीस कोटी निधी दिला जातो. प्रदूषण कमी करण्यासाठी तो खर्च व्हावा, ही अपेक्षा असते. मात्र, हा निधी खर्च करण्यात मनपा अपयशी ठरल्याने चालू आर्थिक वर्षात केंद्राने पाच कोटींची कपात करून मनपाला जोरदार दणका दिला आहे.विभागांना निधी वर्गबांधकाम - ४२ कोटीयांत्रिकी - १५ कोटी ४६ लाखउद्यान - १२ कोटी २ लाखविद्युत - १४ कोटी ६३ लाखपर्यावरण - २ कोटीकेंद्र सरकारने व्हिसीद्वारे आढावा बैठक घेत निधी किती खर्च झाला, याची माहिती घेतली. जून अखेरपर्यंत एकूण निधीच्या ४५ टक्के खर्च झाला पाहिजे.- अजित निकत, उपायुक्त, पर्यावरण विभाग

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक