बाधितांची संख्या पुन्हा तीन हजार नजीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 01:52 AM2022-01-26T01:52:21+5:302022-01-26T01:53:19+5:30

जिल्ह्यात मंगळवारी (दि. २५) २ हजार ९४४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात नाशिक शहरातील १ हजार ९४०, ग्रामीण भागातील ८८३, मालेगावमधील २६, तर जिल्हाबाह्य ९५ रुग्णांचा समावेश आहे. आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६५ टक्के रुग्ण शहरातील आहे. दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १ हजार ९१२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

The number of victims is again close to three thousand | बाधितांची संख्या पुन्हा तीन हजार नजीक

बाधितांची संख्या पुन्हा तीन हजार नजीक

Next
ठळक मुद्देदिवसभरात दोघांचा मृत्यू : ६५ टक्के रुग्णवाढ शहरात

नाशिक : जिल्ह्यात मंगळवारी (दि. २५) २ हजार ९४४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात नाशिक शहरातील १ हजार ९४०, ग्रामीण भागातील ८८३, मालेगावमधील २६, तर जिल्हाबाह्य ९५ रुग्णांचा समावेश आहे. आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६५ टक्के रुग्ण शहरातील आहे. दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १ हजार ९१२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

जिल्ह्यात सोमवारी २ हजार २०४ पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या मंगळवारी पुन्हा तीन हजारांजवळ पोहोचली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येने १८ हजार हजारांचा टप्पा पार केला आहे. मागील आठ दिवसांत दोनदा अपवाद वगळता रुग्णसंख्या सातत्याने अडीच हजारांहून अधिक आढळून येत आहे. दरम्यान, मंगळवारी नाशिक शहरातील १ व ग्रामीण भागातील १ अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८ हजार ७८५ वर पोहोचला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ४ हजार ३०१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित होते. कोरोनाबरोबरच वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखीचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

--------

 

१९ जानेवारी : २९९९

२० जानेवारी : २४१७

२१ जानेवारी : २९३९

२२ जानेवारी : २५२४

२३ जानेवारी : २५२६

 

२४ जानेवारी : २२०४

२५ जानेवारी : २९४४

Web Title: The number of victims is again close to three thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.