शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाढले भारी, शिक्षणाधिकारी आयुक्तांच्या दारी

By suyog.joshi | Updated: July 4, 2024 11:19 IST

महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत.

नाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. बुधवारी शिक्षणाधिकारी तथा प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना शिक्षकांच्या भरतीबद्दल अवगत केले.

शहरातील ८२ शाळा स्मार्ट झाल्याने शाळेचे रुपडे बदलले असून साडे सहाशे वर्गखोल्या डिजिटल बनल्या आहेत. नुकत्याच मनपाच्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यातून तिसऱ्या क्रमंकाचा बहूमान मिळाला. दर्जेदार शिक्षनामुळे मनपा शाळांकडे पाहण्याचा दुष्टीकोन बदलू लागला आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७३० विद्यार्थी वाढले आहेत.

आपल्या पाल्याला इथेच प्रवेश मिळावा. यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेचा शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे म्हणायला हरकत नाही. खासगीकरणामुळे पालिकेच्या शाळा मागे पडल्या होत्या. या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेणार की, नाही असे चित्र होते. परंतु मनपाच्या शाळांची मरगळलेली अवस्था दूर झाली आहे. शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल करण्यात या शाळांना यश आले आहे.

सेवानिवृत्त शिक्षक घेण्याबाबत आयुक्तांशी चर्चा

शिक्षणाधिकारी तथा प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याशी बुधवारी शिक्षकांच्या भरतीबद्दल चर्चा केली. पवित्र पोर्टलच्या भरतीबद्दल तांत्रिक अडचणी येत असल्याने सध्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होवू नये यासाठी सध्या तरी सेवानिवृत्त शिक्षकांना घेता येऊ शकते का याबद्दल विचार विनिमय केला. त्यावेळी आयुक्तांनी यावर लवकरच विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले. कारण २०२३ च्या संचमान्यतेनुसार शासनाने अद्याप कोणतीही भरती केली नाही. नवीन भरती करणे हे शासनाच्या अखत्यारित असल्याने त्याचे अधिकार स्थानिक स्तरावर महापालिकेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना भरती करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या वाढलेली विद्यार्थी संख्या कौतुकास्पद आहे. असे असले तरी नवीन आलेले विद्यार्थी इतरत्र कुठेही जाऊ नये यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याबाबत विचार-विनिमय सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.-बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थी