पहिला निकाल येणार सकाळी सव्वादहाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:01 IST2022-01-19T00:01:05+5:302022-01-19T00:01:05+5:30
नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि. १९) होत आहे. इव्हीएमद्वारे होणाऱ्या मतमोजणीमुळे पहिला निकाल पहिल्या पंधरा मिनिटांत अर्थात सव्वा दहा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा कळवण येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पटेल यांनी व्यक्त केली.

पहिला निकाल येणार सकाळी सव्वादहाला
नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि. १९) होत आहे. इव्हीएमद्वारे होणाऱ्या मतमोजणीमुळे पहिला निकाल पहिल्या पंधरा मिनिटांत अर्थात सव्वा दहा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा कळवण येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पटेल यांनी व्यक्त केली.
कळवण, देवळा, पेठ, सुरगाणा, निफाड व दिंडोरी या सहा नगरपंचायतींमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदानाचा पहिला टप्पा दि. २१ डिसेंबर रोजी व ओबीसी आरक्षणामुळे स्थगित ठेवलेल्या जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात दि. १८ जानेवारीला मतदान घेण्यात आले होते. सुमारे महिनाभर मतमोजणी रखडल्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार व जनसामान्यांना निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती.
इव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होत असल्याने दुपारपर्यंत सहाही नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.