शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार

By suyog.joshi | Updated: January 18, 2024 16:12 IST

याबाबत संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

नाशिक : शहरात महापालिकेच्या हद्दीत किंवा रस्त्यांवर भंगार जुनी दुचाकी, चारचाकी वाहने आढळल्यास महापालिका थेट उचलून आडगाव येथील गुदामात टाकून देणार असून याबाबत फेब्रुवारी महिन्यापासून कारवाई करण्यात येणार आहे.  बेवारस वाहनांचे मालक, चालक, गॅरेजधारक व वापरकर्ते यांच्यासह महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पूल, फूटपाथ, उड्डाणपुल येथे अनधिकृतपणे सोडून दिलेली बेवारस वाहने, नादुरूस्त असलेली वाहने, दुरूस्तीकरता आलेली वाहने इत्याद हटविण्याची कारवाई मनपातर्फे लवकरच हाती घेतली जाणार आहे. तसेच यापुढे सदरची कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. याबाबत संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

शहरातील विविध रस्त्यावर धावणा-या वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बाजारपेठांबरोबरच तसेच दाट लोकवस्ती असलेल्या शहरातील मोक्याच्या जागी भंगार विक्रेते तसेच गॅरेजेस यांनी आपली दुकाने भर रस्त्यातच थाटल्याने वाहनचालकांना व पादचा-यांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागत आहे. भंगार व्यापा-यांबरोबरच वाहतूक कोंडीला गॅरेजचालकांनीही हातभार लावला आहे. शहरातील अनेक गॅरेजेस हे रस्त्यावरच व्यवसाय करताना दिसतात. शहरातील अनेक ठिकाणी ४० ते ५० फुटी रस्त्यावरून एखादी आॅटो रिक्षा अथवा मोटरसायकल जाऊ शकते.

या रस्त्यावर अनेक गॅरेजचालकांनी ठाण मांडले आहे. या रस्त्यात अनेक भंगार वाहने उभी दिसतात. त्यामुळे तीही हटविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा रिक्षांची कामे सुरू असतात. त्यात इंजिन दुरुस्ती, हूड मेकर, नंबर प्लेट बनवणारे, चेसीज् बाहेर काढणारे, स्पेअर पार्ट विकणारे अशा अनेकांनी भाऊगर्दी केली आहे. या त्यांच्या उद्योगाचा इतर वाहनचालकांना प्रचंड त्रास होतो. या गॅरेजचालकांची अनेक वाहने ही भंगारमध्ये जमा करण्यासारखीच असतात. त्यामुळे त्यांनीही मनपाच्या कारवाईचा विचार आहे...तर लागणार दंडमहापालिका क्षेत्रातील जागेवर भंगार वाहने दिसल्यास ती थेट आडगावच्या गुदामात टाकली जाणार आहे. ज्या ग्राहकांची काही हरकत असल्यास किंवा आडगाव गुदामात नेली जाणारी वाहने परत न्यायची असल्यास संबंधित मालकांना दंड आकारला जाणार आह, असेही महापालिकेने म्हटले आहे.महापालिका क्षेत्रातील कोणत्याही जागेवर भंगार वाहने ठेऊ नका. आमच्या मोहिमेत कारवाई करण्यात येईल.-नितीन नेर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक