शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला एफसीआयजवळ ट्रकच्या धडकेने बोगी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 01:30 IST

मनमाड : शहरात असलेल्या भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या (एफसीआय) साठवणूक गोदामाजवळ शुक्रवारी (दि. ८) दुपारी २:३०च्या सुमारास मालवाहतूक करणारी रेल्वे आणि गोदामात माल भरण्यासाठी आलेला ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात रेल्वे मालगाडीची एक बोगी (वॅगन) लोहमार्गावरून घसरली. सुदैवाने या अपघातात ट्रकचालकाचे प्राण वाचले आहेत.

मनमाड : शहरात असलेल्या भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या (एफसीआय) साठवणूक गोदामाजवळ शुक्रवारी (दि. ८) दुपारी २:३०च्या सुमारास मालवाहतूक करणारी रेल्वे आणि गोदामात माल भरण्यासाठी आलेला ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातातरेल्वे मालगाडीची एक बोगी (वॅगन) लोहमार्गावरून घसरली. सुदैवाने या अपघातात ट्रकचालकाचे प्राण वाचले आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदाम क्रमांक २४ जवळ दुपारी महामंडळामधील रिकाम्या बोगी (वॅगन) एकत्रित असताना माघारी येणाऱ्या मालगाडीतील माल भरण्यासाठी आलेला ट्रक क्रमांक (एमएच १८, बीए ०३६९) हा मालगाडीवर येऊन आदळला. हा ट्रक गोदामाकडे फाळके उघडे करून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी तातडीने गोदामात धाव घेत ट्रकचालकाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचले.

 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेAccidentअपघात