Thane: नाशिकच्या ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाण्यात जाहीर प्रवेश
By जितेंद्र कालेकर | Updated: March 26, 2023 19:59 IST2023-03-26T19:58:11+5:302023-03-26T19:59:04+5:30
Shiv Sena: सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जात आहेत. कामगार, महिला आणि गरिबांसाठी अर्थसंकल्पातूनही तरतूद केल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेत (शिंदे गट) दाखल होत आहेत.

Thane: नाशिकच्या ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाण्यात जाहीर प्रवेश
- जितेंद्र कालेकर
ठाणे - सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जात आहेत. कामगार, महिला आणि गरिबांसाठी अर्थसंकल्पातूनही तरतूद केल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेत (शिंदे गट) दाखल होत आहेत. सर्वसामान्यांचा विश्वास शासन सार्थ ठरवेल. तसेच नाशिकच्याही विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली.
ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमातील सभागृहात नाशिकमधील ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी या सर्व पदाधिकाºयांचे स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांची भूमीका स्वीकारुन गोरगरिबांचे सरकार स्थापन केले. चांगले निर्णय घेतले. अर्थसंकल्पातही सर्वसामान्यांसाठी तरतूद केल्यामुळे विरोधकांकडे प्रतिक्रीया देण्यासाठी मुद्दे राहिले नाहीत. विकासाचे प्रकल्प आणि विकासाची गंगा आणण्याचे काम राज्य सरकारने केले. आपण कार्यकर्ता म्हणून काम करतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी बांधील आहे. सरकार म्हणून मुख्यमंत्री या नात्याने आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी असून नाशिकसाठी स्वतंत्र निधीची मागणी नाशिकच्या या पदाधिकाºयांनी केल्यानंतर विकासासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
या पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश
नाशिकमधील ठाकरे गटातील नाशिक इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील १६ सरपंचासह सभापती, माजी नगरसेवक आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी अशा ५० जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदींच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ,माजी नगरसेविका अँड.श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे, शहर समन्वयक ज्योती देवरे, उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे, उप विभाग प्रमुख कुमार पगारे, पिंटू शिंदे, विधानसभा संघटक पश्चिम अनिता पाटील आणि उप विभागप्रमुख आशा पाटील आदींचा यामध्ये समावेश होता.
हे सरकार राज्याला पुढे नेणारे सरकार- मुख्यमंत्री
आपल्या भागातील प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले. त्याचबरोबर आपला विश्वासला तडा जाऊ देणार नाही. तसेच मुख्यमंत्री म्हणून आपण काम करत असलो तरी, तळागाळातील कार्यकर्त्यांशी माझी बांधिलकी आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री