नांदगाव चौफुलीवर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:12 IST2018-08-09T17:11:41+5:302018-08-09T17:12:42+5:30
मालेगाव : मालेगाव-मनमाड रस्त्यावर नांदगाव चौफुलीवर परिसरातील गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. सकाळी ९ वाजेपासून ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने नांदगावसह मनमाडकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.

नांदगाव चौफुलीवर ठिय्या आंदोलन
मालेगाव : मालेगाव-मनमाड रस्त्यावर नांदगाव चौफुलीवर परिसरातील गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
सकाळी ९ वाजेपासून ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने नांदगावसह मनमाडकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता तर पोलिसांनी संरक्षक जाळ्या लावून रस्ता अडविला होता. आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात मुस्लिम समाजासह धनगर समाजाचे कार्यकर्ते सहभागी होवून पाठिंबा दिला होता. आंदोलनात कौळाणे, सोनज, टाकळी, वºहाणे, मेहुणे, शिरसोंडी, मांजरे, जळगाव भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.