थाळीनाद आंदोलन
By Admin | Updated: March 23, 2017 22:45 IST2017-03-23T22:45:02+5:302017-03-23T22:45:38+5:30
दिंडोरी : नरहरी झिरवाळ यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदार निलंबनाच्या घटनेचे पडसाद दिंडोरीत उमटले आहे.

थाळीनाद आंदोलन
दिंडोरी : नरहरी झिरवाळ यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदार निलंबनाच्या घटनेचे पडसाद दिंडोरीत उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरुद्ध गुरुवारी थाळीनाद आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे.
बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे आदिंच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी थाळीनाद करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदारांनी आग्रही मागणी केली म्हणून निलंबन हा कोणता न्याय, असा सवाल करत सरकार वाचविण्यासाठी हुकूमशाही कारभार करत असून सरकारने जनतेचा रोष ओळखत त्वरित कर्जमाफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, शेतकरी संघटनेचे भास्करबाबा गोडसे, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कैलास मवाळ, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, राजेंद्र उफाडे, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, त्र्यंबक संधान, रामदास पिंगळ, मधुकर गटकळ, राजेंद्र ढगे, यू. पी. मोरे, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, तौसिफ मणियार, किरण दुशिंग, माजी जिल्हा परिषद
सदस्य संगीता ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष जयश्री सातपुते आदिंसह कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रंजवे यांना देण्यात आले. (वार्ताहर)