शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

"लोकशाहीवरील हा जबरदस्त हल्ला..."; मनिष सिसोदियांच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 20:16 IST

दिल्लीचे उपमु्ख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या अटकेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक करण्यात होती. 

सिसोदिया यांना आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. राऊस अॅव्हेन्यू कोर्ट कॉम्प्लेक्सच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या वकिलांच्या युक्तिवादाला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला की सीबीआय कोणत्याही परिस्थितीत तपास करू शकते. 

मनिष सिसोदियांच्या या अटकेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. हा लोकशाहीवरील जबरदस्त हल्ला आहे. ते उपमुख्यमंत्री आहे. अनेक खाते देखील त्यांच्याकडे आहे. त्यांनी शाळांना जो दर्जा प्राप्त करून दिला. त्यांची जगात वाहवा होतेय, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

दरम्यान, आज शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. यावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं. तुम्ही आयुष्यभर ज्यांचं मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदावर नेमलं, म्हणून तुम्ही आज गद्दारीची क्रांती करू शकलात. तुम्ही त्यांचे फोटो काढता याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तसेच शिंदे गटाचं संबंधित कृत्य हा शूद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे, असा निशाणाही संजय राऊतांनी साधला. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाSanjay Rautसंजय राऊत