नेटमुळे टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण
By Admin | Updated: November 4, 2015 23:20 IST2015-11-04T23:20:12+5:302015-11-04T23:20:51+5:30
पेच : परीक्षा पुढे घेण्याची भाजयुमोची मागणी

नेटमुळे टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण
नाशिक : राज्यात २७ डिसेंबर रोजी राज्य पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आणि अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असणारी नेट परीक्षा ही एकाच दिवशी असल्याने टीईटी पुढे ढकलण्याची मागणी भाजयुमोने केली आहे.
टीईटीची परीक्षा उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे; परंतु त्याचबरोबर अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षाही देणे तितकीच आवश्यक आहे. नेट परीक्षा सकाळी ९.३० ते ४.५० वाजेपर्यंत होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर उमेदवारांना दोन्ही परीक्षा देणे शक्य होणार नाही.
राज्यातील लाखो युवक या परीक्षेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर शासनाने टीईटी परीक्षा २७ डिसेंबर रोजी न घेता अगोदर किंवा नंतर घ्यावी, अशी मागणी भाजयुमोने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
मोर्चाचे प्रदेश सदस्य किशोर जगताप यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील प्रा. किशोर जगताप, रूपाली पाटील, नितीन पाटील, प्रियांका सोनवणे, सोनल जाधव, ऋषी घरटे, प्रा. आशिष चौधरी, हर्षल माळी, किरण गाढवे, भूषण दाभाडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)