Testimonial to Ranjeway Assistant Police Inspector at Deola | देवळा येथील सहायक पोलिस निरीक्षक रंजवे यांना प्रशस्तीपत्र
देवळा येथील सहायक पोलिस निरीक्षक रंजवे यांना प्रशस्तीपत्र

ठळक मुद्देदिंडोरी पोलीस ठाण्यास दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यात कुशलतेने तपास केले.

खर्डे : येथील देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यास दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यात कुशलतेने तपास केले. त्यानंतर त्याची सत्र न्यायालयात सुनावणी होवून गुन्ह्यातील आरोपीस दोषी धरून तीन वर्ष सक्त मजुरी व दोन हजार रु पये दंड अशी शिक्षा झालेली आहे. त्यांनी केलेल्या या उत्कृष व उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२३) त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

फोटो देवळा येथील पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना प्रशस्तीपत्र देतांना पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह.


Web Title: Testimonial to Ranjeway Assistant Police Inspector at Deola
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.