‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने सफारी लांबविली

By Admin | Updated: December 22, 2015 23:42 IST2015-12-22T23:41:02+5:302015-12-22T23:42:04+5:30

‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने सफारी लांबविली

The 'test drive' is made to clean the safari | ‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने सफारी लांबविली

‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने सफारी लांबविली

द्वारका जवळील घटनानाशिक : शोरूममध्ये कार विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली तेरा लाखांची नवी कोरी सफारी कार चाकूचा धाक दाखवून (एमएच १५, टीसी १४७४) लांबविल्याची घटना सोमवारी (दि़२१) द्वारकाजवळ घडली़
मुंबई-आग्रा महामार्गावर कंचन मोटर्स हे शो रूम असून, त्यामध्ये देवेंद्र मनोज पवार (शिवशक्ती चौक, सिडको) हे नोकरीस आहेत़ सोमवारी या शोरूममध्ये सफारी कार विकत घेण्याच्या बहाण्याने एक संशयित आला़ त्याने सफारी स्ट्रोम कार व्ही एक्स ४/२ सफेद रंगाची कार पसंत करून तिच्या टेस्ट ड्राईव्हची मागणी केली़ ग्राहकाची ही मागणी कंपनीने मान्य करून टेस्ट ड्राईव्हसाठी प्रतिनिधी मनोज पवार यांना पाठविले़ कारची टेस्ट ड्राईव्ह घेणाऱ्या संशयिताने द्वारका येथे उतरणाऱ्या पुलाच्या सुमारे पंचवीस फूट अगोदर वाहन थांबवून पवार यांच्या गळ्याला चाकू लावला़ तसेच शिवीगाळ करून त्यांना कारच्या खाली ढकलून देऊन पळ काढला़
संशयिताने लांबविलेल्या या कारची अद्याप आरटीओ तपासणीही झालेली नाही़ दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती घेऊन तपास सुरू केला आहे़ या प्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The 'test drive' is made to clean the safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.