नाशिक : प्रेयसीसह तिची मुलगी व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जाळून मारणारा संशयित जलालुद्दीन अली महमंद (५०, रा. अलिगढ, उत्तर प्रदेश) यास रविवारी (दि़१९) न्यायालयात हजर केले असता त्यास दि़२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.दिंडोरीरोडवरील कालिकानगर येथे ६ आॅगस्ट रोजी प्रेयसी सोबत झालेल्या वादातून नऊ महिन्याच्या बाळासह दोघींवर रॉकेल ओतून जीवंत जाळल्यानंतर संशयित खान फरार झाला होता़ त्यास पंचवटी पोलिसांनी पकडले असता तो हातावर तुरी देऊन फरार झाला होता़ त्यास गुन्हे शाखेने पुन्हा अलिगढ येथून अटक केली.
तिहेरी खुनातील संशयितास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:29 IST