चांदवड पेट्रोलपंप चौफुलीवर एस.टी.बस व कंटनेरचा भीेषण अपघात; बस वाहक ठार
By धनंजय वाखारे | Updated: September 28, 2023 14:25 IST2023-09-28T14:24:48+5:302023-09-28T14:25:33+5:30
बसमधील दोन मुले व एक मुलगी किरकोळ जखमी

चांदवड पेट्रोलपंप चौफुलीवर एस.टी.बस व कंटनेरचा भीेषण अपघात; बस वाहक ठार
चांदवड, नाशिक - मुंबई आग्रा महामार्गवर चांदवड पेट्रोल पंप चौफुलीवर गुरुवार दि २८ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मालेगाव कडून येणारा कंटेनर (एम एच 04/ के यु 6654) हा नाशिककडे जात असताना .चांदवड मार्गे मनमाडला जाणारी एसटी बस ( क्र मांक एम एच 40 एन 9419) यांच्यात भीषण अपघात होऊन एसटीचे वाहक बी.एस. दळवी (वय 50) रा परभणी, नांदेड हे जागीच ठार झाले आहे.
एसटी बस पेट्रोल पंप चौफुलीवरुन वळण घेऊन चांदवडकडे जात असताना मागच्या डाव्या बाजूला कंटेनरने भीषण धडक दिली. सुदैवाने एसटीबसमध्ये दोन मुले एक मुलगीच असल्याने मोठा अनर्थ टळला. बस चालक बबन सिताराम वडवक्ते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चांदवड उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे औषध उपचार घेत आहेत.
जखमी शालेय तीन विद्यार्थीमध्ये जयेश दौलत आहेर वय 17, रा. भुत्याने , राकेश संजय भवर वय 17, रा. पुरी हे दोघे किरकोळ जखमी तर विद्या शामराव आहेर वय 17 रा. भुत्याने या विद्यार्थिनीचा डावा हात फॅक्चर झाला आहे.तर बस चालक 4) बबन सिताराम वडक्ते (57) रा. खादगाव ता. नांदगाव हे पण जखमी झाले.