डीएलडी प्रवेश अर्जासाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ
By Admin | Updated: August 1, 2016 00:30 IST2016-08-01T00:30:44+5:302016-08-01T00:30:52+5:30
डीएलडी प्रवेश अर्जासाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ

डीएलडी प्रवेश अर्जासाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ
नाशिक : शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश इच्छुक बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डी.एल.एड (डीएड) प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ मिळाली असून, ४ आॅगस्टपर्यंत अर्जांची पडताळणी करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आॅनलाइन अर्ज दाखल करून शासकीय अध्यापिका महाविद्याल यातील केंद्रावर ४ आॅगस्टपर्यंत पडताळणी करून जमा करण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राकडून करण्यात आले आहे. न्यायालयाकडून १८ जुलै रोजी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर २१ ते ३१ जुलै या कालावधीत आॅनलाइन अर्ज सादर करून १ आॅगस्टपर्यंत या अर्जांची पडताळणी करून ते जमा करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र रविवारी अर्ज पडताळणीच्या अंतिम दिवशी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरणे,पडताळणीच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)