शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 14:22 IST

एकूण ३५ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली गेली होती. या सर्व मानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता मागील २९ जूनला पुर्ण झाला आहे.

ठळक मुद्देवनविभाग लवकरच राबविणार प्रक्रियामानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळमहत्त्वाचा दुवा म्हणून मानद वन्यजीव रक्षकाची भूमिका

नाशिक : पर्यावरण, निसर्ग, वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी वनविभाग व सर्वसामान्य जनता यांच्यात जनजागृतीची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ नुकताच पुर्ण झाला आहे. यामुळे आता पुढील तीन वर्षांकरिता नव्याने नियुक्तीची प्रक्रिया लवकरच वनविभागाकडून राबविली जाण्याची चिन्हे आहेत.निसर्गाविषयीची आवड आणि जिज्ञासेपोटी निसर्गातील पशु, पक्ष्यांसह पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या कृतिशिल अभ्यासक लोकांमधून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलम-४नुसार मानद वन्यजीव रक्षकांंची नियुक्ती शासनाच्या महसूल व वनविभागाकडून तीन वर्षांकरिता केली जाते. २९ जुन २०१७ साली शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीचा शासननिर्णय जाहीर केला होता. या शासननिर्णयाचा कालावधी गेल्या जून महिन्यात पुर्ण झाला. जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा आवाका तसेच जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यजीवसंपदा आदि बाबी लक्षात घेता कोठे चार तर कोठे तीन, दोन आणि एक याप्रमाणे मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली जाते. नागपूरसाठी मागील शासननिर्णयानुसार चार तर चंद्रपूर, अमरावतीसाठी तीन गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन तर मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यासह उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक असे एकूण ३५ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली गेली होती. या सर्व मानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता मागील २९ जूनला पुर्ण झाला आहे.

जनप्रबोधनासाठी महत्त्वाची भूमिकामानव-वन्यप्राणी संघर्ष असो किंवा पर्यावरण संरक्षण, वन व वन्यजीव संवर्धन असो यासाठी जनप्रबोधन करण्याकरिता वनविभाग व सर्वसामान्य लोकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून मानद वन्यजीव रक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव