दहावी, बारावीच्या क्लासेलाही परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST2021-03-13T04:27:01+5:302021-03-13T04:27:01+5:30

नाशिक जिल्हा क्लासेस संचालकांची संघटनेच्या कार्यालयात बुधवारी (दि.१०) बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मांडण्याचे ...

Tenth, twelfth class should also be allowed | दहावी, बारावीच्या क्लासेलाही परवानगी मिळावी

दहावी, बारावीच्या क्लासेलाही परवानगी मिळावी

नाशिक जिल्हा क्लासेस संचालकांची संघटनेच्या कार्यालयात बुधवारी (दि.१०) बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मांडण्याचे ठरले. त्यानुसार प्रशासनाशी संपर्क साधून व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या निर्बंधाच्या आदेशानुसार, पहिली ते नववी आणि अकरावीचे क्लासेस बंद ठेवण्याचे आश्वासन क्लासेस चालकांनी दिले. मात्र ज्याप्रमाणे शाळा व कनिष्ठ महाविद्यलायांमध्ये दहावी व बारावीचे वर्ग पालकांच्या संमतीने सुरू आहेत. त्याचप्रमाणे शहर व जिल्ह्यातील सर्व क्लासेस संचालक हे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेतील व कमी संख्येने, मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटर आदींचा वापर करून व एकाआड एक बेंचवर​ विद्यार्थी बसवून फिजिकल डिस्टन्सिग ठेवून क्लासेस घेतील. या नियम व अटींनुसार १५ ते २० विद्यार्थ्यांना घेऊन शिकवणी घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व क्लासेस संचालक वेळोवेळी स्वतःची कोविड टेस्ट करून घेतील व त्याचा रिपोर्ट स्वतःजवळ बाळगतील, अशी ग्वाही संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष जयंत मुळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व क्लासेस संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.

===Photopath===

120321\12nsk_18_12032021_13.jpg

===Caption===

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देताना नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघननेचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्यासह पदाधिकारी 

Web Title: Tenth, twelfth class should also be allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.