शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:48 IST

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होत असते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये होत असून, येत्या २० नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहे. दिंडोरी केंद्र क्रमांक १७३० या केंद्राची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्रसंचालक प्राचार्य बी. जी पाटील. यांनी दिली.

ठळक मुद्देदिंडोरी केंद्राची आसनव्यवस्था जाहीर

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होत असते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये होत असून, येत्या २० नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहे. दिंडोरी केंद्र क्रमांक १७३० या केंद्राची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्रसंचालक प्राचार्य बी. जी पाटील. यांनी दिली.कोरोनाच्या या कालावधीत विविध नियम पाळून ै परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मंडळाने विविध मार्गदर्शक सूचना केंद्रसंचालक यांना दिल्या आहेत. दिंडोरी येथील केंद्र क्रमांक १७३० या केंद्रात होणाऱ्या परीक्षेची आसनव्यवस्था जनता इंग्लिश स्कूलच्या मुख्य इमारतीमध्ये करण्यात आली आहे.परीक्षार्थींनी सर्व नियमांचे पालन करून वेळेत परीक्षेसाठी उपस्थित रहावे. परीक्षा यशस्वी करण्यासाठी केंद्रसंचालक बी. जी. पाटील, उपकेंद्रसंचालक संतोष कथार, अरुण पाटील आदींसह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.बोर्डाच्या आदेशानुसार या वर्षीपासून उशिरा येणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश मिळणार नाही. परीक्षार्थीनी पेपरच्या दिवशी सकाळी १० वाजता केंद्रावर उपस्थित रहावे. १०.३० वाजता पेपर सुरू होईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही. मास्क लावूनच परीक्षेसाठी यावे. केंद्रावर आल्यावर गेटजवळ साबण व पाणी ठेवले असेल त्याठिकाणी हात स्वच्छ घुवावे व सॅनिटायझर लावून पुढे थर्मल स्कीनिंग गनने ताप मोजला जाईल व त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल.

टॅग्स :ssc examदहावीStudentविद्यार्थी