शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दहाव्याला कीर्तन नव्हे, तर हृदयरोगावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:23 IST

मनुष्य गेल्यानंतर त्याच्या दु:खावेगातून सावरणे कठीण असताना, अशाही परिस्थितीत समाजाचा विचार करणारे विरळेच. पण, जऊळके -वणी येथील पाटील कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात हृदयरोगावर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करून सामाजिक संवेदनेचा आदर्श समोर ठेवला.

नाशिक : मनुष्य गेल्यानंतर त्याच्या दु:खावेगातून सावरणे कठीण असताना, अशाही परिस्थितीत समाजाचा विचार करणारे विरळेच. पण, जऊळके -वणी येथील पाटील कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात हृदयरोगावर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करून सामाजिक संवेदनेचा आदर्श समोर ठेवला.जऊळके-वणी गावाच्या शिवारातील एका प्रतिष्ठित शेतकरी पाटील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील पस्तीशीच्या आतील युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूतून सावरत कुटुंबीयाने नुकतेच मयत सचिन बाळासाहेब पाटील यांच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात धार्मिक विधी आटोपून भजन, कीर्तनाऐवजी शहरातील हृदयरोगविकार तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी सुमारे एक हजारांहून अधिक लोक दहाव्यासाठी जमले होते. समाजातील नागरिकांपर्यंत हृदयविकारासंबंधी असलेल्या गैरसमजुती दूर होण्यास मदत होईल आणि जागरूकता निर्माण होईल, या उद्देशाने पाटील कुटुंबीयांनी व्याख्यानाचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत एक वेगळा संदेश समाजाला दिला.वाढता ताणतणाव, स्पर्धा, बदलती आहारशैलीमुळे हृदयरोगाचा वयोगट अलीकडे कमी झाला आहे. ऐन तारुण्यात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण वाढत असून, ही चिंतेची बाब बनली आहे. यामुळे समाजात विशेषत: तरुणाईमध्ये हृदयविकाराविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. पाटील कुटुंबीयांनी घातलेला हा पायंडा समाजात हृदयरोगाविषयी जनजागृती वाढविण्यासाठी पूरक ठरणारा आहे. हृदयरोगाविषयीची जनजागृती समाजात होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेत आपल्या कुटुंबावर जसा प्रसंग बेतला तसा समाजातील अन्य कोणत्या कुटुंबावर येऊ नये, असा दूरदृष्टिकोन बाळगत जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. दरम्यान, धर्माधिकारी यांनी हृदयरोगासंबंधी विविध माहिती देत घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले.मागील काही वर्षांत तरुणाईत हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे. समाजात हृदयरोगाविषयी विविध समज-गैरसमज असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे ते दूर होण्यास मदत होईल. पाटील कु टुंबीयांनी केलेला हा नावीन्यपूर्ण प्रयोग नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी आहे.- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोग तज्ज्ञरात्री झोपेतच माझ्या मुलाची हृदयविकाराने प्राणज्योत मालवली. हृदयविकाराविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने व्याख्यानाच्या आयोजनाचा निर्णय घेतला. प्रवचन, कीर्तन, भजन लोकांनी आतापर्यंत खूप ऐकली आहेत; मात्र अशाप्रकारच्या जीवघेण्या आजाराविषयी समाजाला माहिती व्हावी, या उद्देशाने डॉ. धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सुमारे तासभर चाललेल्या या व्याख्यानाला शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले नागरिक स्तब्ध होऊन ऐकत होते.  - बाळासाहेब पाटील, वडील

टॅग्स :social workerसमाजसेवकSocialसामाजिक