नियमित शुल्कासह २५ जानेवारीपर्यंत भरता येणार दहावीचे परीक्षा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:52+5:302021-01-13T04:35:52+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास २५ जानेवारीपर्यंत ...

नियमित शुल्कासह २५ जानेवारीपर्यंत भरता येणार दहावीचे परीक्षा अर्ज
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या वाढीव मुदतीततही विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज सादर करता येणार आहे.
दहावीच्या परीक्षेसाठीच्या अर्ज प्रक्रियेस यावर्षी कोरोनामुळे उशिरा सुरुवात झाली असून, परीक्षाही दरवर्षीपेक्षा उशिरानेच होण्याचे संकेत आहेत. परीक्षा अर्ज सादरकरण्यासाठी प्रारंभी २३ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, यापूूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व निवडक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर १२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत शाळांना शुल्क जमा करण्याची मुदत आहे.