नाशिकमध्ये तणाव कायम, तिस-या दिवशीही इंटरनेट सेवा बंद

By Admin | Updated: October 12, 2016 10:20 IST2016-10-12T10:19:42+5:302016-10-12T10:20:56+5:30

तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणानंतर धुमसणा-या नाशिकमधील तणाव अद्यापही कायम असून कोणत्याही अफवा पसरू नयेत यासाठी तिस-या दिवशीही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

Tensions persisted in Nasik, internet service closed for the third day | नाशिकमध्ये तणाव कायम, तिस-या दिवशीही इंटरनेट सेवा बंद

नाशिकमध्ये तणाव कायम, तिस-या दिवशीही इंटरनेट सेवा बंद

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १२  -  तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणानंतर धुमसणा-या नाशिकमधील तणाव अद्यापही कायम असून कोणत्याही अफवा पसरू नयेत यासाठी तिस-या दिवशीही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 
त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव-अंजनेरी येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस येताच, या घटनेचे नाशिक परिसरात तीव्र पडसाद उमटले. रविवारी काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्याच पार्श्वभूमीवर वातावरण चिघूळ नये, अफवा पसरु नयेत यासाठी मोबाईल डेटा आणि इंटरनेट सेवा दोन दिवसांसाठी खंडीत करण्यात आली होती. मात्र या घटनेला तीन दिवस झाल्यानंतरही शहरातील तणाव अद्याप कायम आहे. काल रात्री नाशिकमधील काही भागात दगडफेकीचे प्रकार इंटरनेट बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.  सोशल मीडियावरुन अफवा, प्रक्षोभक मजकूर पसरु नये हा यामागचा उद्देश आहे. तसेच आता मद्य दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
(तणाव टाळण्यासाठी नाशिकमध्ये मोबाइल डेटा आणि इंटरनेट सेवा बंद)
 
ळेगाव-अंजनेरी येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर येताच संपूर्ण नाशिकमध्ये आंदोलने सुरु झाली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत एस.टी. बसेस व इतर वाहने पेटवून दिली. दगडफेकीत ३५ पोलीस जखमी झाले. अनेक ठिकाणी जाळपोळीचे सत्र सुरूच होते.
दरम्यान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी नाशिकमध्ये पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व 15 दिवसात आरोपपत्र दाखल करुन जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन दिले.
 

Web Title: Tensions persisted in Nasik, internet service closed for the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.