पुरोहित संघाचे अतिक्रमण हटविण्यावरून तणाव
By Admin | Updated: June 15, 2015 23:53 IST2015-06-15T23:52:35+5:302015-06-15T23:53:06+5:30
दगडफेक : पोलिसांकडून बळाचा वापर

पुरोहित संघाचे अतिक्रमण हटविण्यावरून तणाव
पंचवटी : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही मिरवणुकीच्या मार्गावर महापालिकेने सोमवारी राबविलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत रामकुंडावरील पुरोहित संघाचे कार्यालय हटविण्यावरून तणाव निर्माण झाला. पालिकेच्या मोहिमेला विरोध करण्यासाठी पुरोहितांनी थेट कार्यालयात ठाण मांडले. यावेळी पथकावर दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्यामुळे वाद चिघळला. त्यानंतर पालिकेने शेड हटविले असून, अन्य अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात आली. पालिकेची ही कृती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप पुरोहित संघाने केला आहे.