चिंचावडला पुतळा बसविण्यावरून तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST2021-02-23T04:22:17+5:302021-02-23T04:22:17+5:30

तालुक्यातील चिंचावड येथे गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी गावाच्या मुख्य चौकात चबुतरा बनवून विनापरवानगी पुतळा स्थापित केला होता. याची ...

Tension over installation of statue at Chinchawad | चिंचावडला पुतळा बसविण्यावरून तणाव

चिंचावडला पुतळा बसविण्यावरून तणाव

तालुक्यातील चिंचावड येथे गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी गावाच्या मुख्य चौकात चबुतरा बनवून विनापरवानगी पुतळा स्थापित केला होता. याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास डुमणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत कायदेशीर प्रक्रियेनंतरच पुतळा बसवावा असे स्पष्ट केले होते. मात्र, सोमवारपर्यंत पुतळा जागेवरच होता. या घटनेची गंभीर दखल घेत सोमवारी तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस अधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक देविदास डुमणे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, आदींनी ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा करून पुतळ्याची विधिवत पूजा करून तो प्रशासनाच्या ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र, ग्रामस्थ त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गर्दीला पांगविले. यानंतर विधिवत पूजा करून पुतळा ताब्यात घेण्यात आला आहे. येथील तहसील कार्यालयात हा पुतळा ठेवण्यात आला आहे.

इन्फो

शीघ्र कृती दलाला पाचारण

पुतळा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेच्या वेळी घटनास्थळी शीघ्र कृती दलाचे जवान, तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महिला कर्मचारी दाखल झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनापरवानगी पुतळा बसविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डुमणे हे करीत आहेत.

Web Title: Tension over installation of statue at Chinchawad