वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्तीचे धडे
By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-12T01:17:33+5:302014-08-13T00:45:29+5:30
वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्तीचे धडे

वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्तीचे धडे
निफाड : येथील वैनतेय विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वैनतेय विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये समुपदेशन विभागाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘तणावमुक्त अभ्यासाचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नाशिक येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आदिती जोशी यांनी विद्यार्थी व पालक यांनी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद पाटील-कराड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, अॅड. दिलीप वाद्यावकन, किरण कापसे, भालचंद्र मोगल, प्राचार्य के. के. निकम आदि मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना जोशी यांनी सांगितले की, दहावी, बारावीचे वर्ष महत्त्वाचे आहे. हे विद्यार्थीदशेतच मुलांच्या
मनावर पालक आणि शिक्षक बिंबवत असतात. त्यामुळे मुले या वर्षांमध्ये एका वेगळ्या चिंतेत वावरू लागतात. वास्तविक सर्वच इयत्ता महत्त्वाच्या असतात. त्यामुळे टेंशन न घेता अभ्यास करा, यश तुमचेच असेल, असेही जोशी यांनी सांगितले. मान्यवर पाहुण्यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
बियाणे कंपनीवर कारवाईची मागणी
कनाशी : बोगस सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असून, सदरील कंपनीच्या बियाण्यांची चौकशी करून परवाने रद्द करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
कनाशी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी
केली. बरेच दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी सोयाबीनची बिजे पूर्णपणे अंकुरलीच नाहीत. त्यामुळे त्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची
संकट आले असून, बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे आणावे कोठून
आणि बियाणे खरेदी करावे तरी कोणते असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.
चालू वर्षाच्या हंगामाकरिता सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाली. सोयाबीनचे पीक अल्पकालावधीतील आहे. त्यामुळे सोयाबीन निघाल्यावर दुसरे पीक घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. ज्या कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे घेतले ते उगवण क्षमतेत अयशस्वी झाले. असे बियाणे परत घेण्यास कृषी केंद्र संचालक नकार देतात व पक्के बिलाची पावती न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तरी सदरील कंपनीच्या बियाण्यांची चौकशी होऊन परवाने रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.