शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
2
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
3
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
4
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल' थोड्याच वेळात; आकडे समोर येणार, देशाचा कल कळणार
5
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
6
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
7
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
8
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
9
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
10
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
11
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
12
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
13
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
14
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
15
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
16
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
17
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
18
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
19
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
20
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

आघार बुद्रुकसह धवळेश्वरला तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 9:55 PM

मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक व धवळेश्वर येथे कमानीवर लावलेल्या ध्वजावरुन वाद झाल्याने दुपारी काही काळ तणाव निर्माण झाला होता: मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन बळाचा वापर करीत जमावाला पांगवले. पोलिस अधिकारी व तहसीलदार ज्योती देवरे यांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. दरम्यान याप्रकरणी पोलीसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

आघार बुद्रुकला कमानीवर ग्रामदैवत तुळजाभवानी माता व धवळेश्वर येथील कमानीवर रु ख्मीणी मातेचा ध्वज लावण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये करण्यात आला होता. या ठरावाला काही लोकांचा विरोध होता. त्यामुळे या दोन्ही गावात वाद होता. त्याचे रुपांतर तणावात झाले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोन्ही समाजातील नागरिकांना एकत्र बसवत हा प्रश्न मिटवला.शनिवारी आघार बुद्रुक ग्रामस्थांनी ग्रामदैवत तुळजाभवानी मातेचा ध्वज वाजत गाजत लावला होता. परंतु रविवारी (दि.२६) दुपारी अचानक ध्वज लावण्याच्या कारणावरु न धुसफूस सुरू झाली. दोन्ही गट आमने- सामने उभे ठाकल्याची माहिती पोलिसांना कळताच तहसीलदार देवरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील बच्छाव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. वाद वाढू लागल्याने पोलीसांना काहीसा बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर गावात शांतता पसरली. दोन्ही गावातील परिस्थिती नियंत्रणात असून या घटनेशी संबंधीत पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा