फलक फाडल्याने तणाव
By Admin | Updated: May 27, 2014 00:04 IST2014-05-26T18:33:58+5:302014-05-27T00:04:56+5:30
विडीकामगारनगर : पोलीसात तक्रार दाखल

फलक फाडल्याने तणाव
विडीकामगारनगर : पोलीसात तक्रार दाखल
पंचवटी : शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना शुभेच्छा देण्यासाठी विडीकामगार नगर येथे कार्यकर्त्यांनी लावलेला शुभेच्छा फलक फाडल्याने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते.
याबाबत सुनिल भोजणे या युवकाने आडगाव पोलीसात अज्ञात व्यक्तींविरूद्ध तक्रार नोंदविल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सकाळी फलक फाडल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती सदर प्रकरणाची माहीती आडगाव पोलीसांना मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर तणावाचे वातावरण निवळले होते. मध्यरात्रीच्या सुमाराला कोणीतरी खोडसर वृत्तीने फलक फाडून कुरापत काढली असावी अशी शक्यता आडगाव पोलीसांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)