शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पूर्व प्रभागसभेत  काहीकाळ तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:49 IST

पूर्व प्रभागसभेत महापालिका आयुक्तांनी मांडलेल्या कामाची आवश्यकता, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा फटका चार महिन्यांनंतर झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेला बसला त्यामुळे विषयपत्रिकेवर एकही विषय नसल्याने सभेत आरोग्य आणि पाणीप्रश्नावरून प्रशासनावर सदस्य आक्रमक झाले. यामुळे प्रभागसभेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

इंदिरानगर : पूर्व प्रभागसभेत महापालिका आयुक्तांनी मांडलेल्या कामाची आवश्यकता, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा फटका चार महिन्यांनंतर झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेला बसला त्यामुळे विषयपत्रिकेवर एकही विषय नसल्याने सभेत आरोग्य आणि पाणीप्रश्नावरून प्रशासनावर सदस्य आक्रमक झाले. यामुळे प्रभागसभेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.  पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मधील वडाळागावात गेल्या वीस दिवसांपूर्वी साथीच्या आजाराने म्हणजे चिकनगुन्याने नागरिक त्रस्त झाले होते जेव्हा घटना घडते तेव्हाच उपाययोजना करण्यात येते त्याआधी काय उपाययोजना करण्यात येत नाही? असा प्रश्न अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केला तसेच धूर व औषध फवारणी होत नाही. वडाळागाव व राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथावरील अतिक्रमण का काढले जात नाही अशीही तक्रार बडोदे यांनी केली.  द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांचा पालापाचोळा ठिकठिकाणी पडून असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो तातडीने उचलण्याची मागणी अर्चना थोरात यांनी केली. तसेच प्रभाग ३० मधील पांडवनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि वडाळा-पाथर्डी रस्त्यावर पुन्हा भाजीविक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन लहान-मोठे अपघात होत असल्याची तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली तसेच चार्वाक चौक परिसरात व्हालमनच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागले त्यामुळे त्याची बदली करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली.वडाळागावात होणारा गढूळ पाणीपुरवठा आणि रामोशीगल्लीत सुमारे दीड महिना जलवाहिनी टाकण्याच्या कामास वेळ लागल्याने त्याचा जाब सुप्रिया खोडे यांनी विचारला. राजवाडासह परिसरातील भूमिगत गटारीचे चेंबर तुटले असून, ते दुरुस्त करण्यात येत नसल्याची तक्रार शोभा साबळे यांनी केली. सभेस विभागीय अधिकारी जयश्री सोनावणेंसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्रभागात किती सफाई कर्मचारीसुमारे चार महिन्यांपूर्वी झालेल्या प्रभागसभेत प्रत्येक सदस्याला त्यांच्या प्रभागात किती सफाई कर्मचारी आहे त्यांचे नाव आणि फोननंबरची यादी देण्यात येणार होती ती अद्याप दिली गेली नाही, अशी तक्रार आशा तडवी यांनी केली तसेच स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांना सुमारे पंधरा ते वीस वेळा फोन करून सुद्धा ते उचलत नाही किंवा परत आम्हाला फोन करत नाही, असे तडवी यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका