टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा १६ पासून

By Admin | Updated: July 13, 2014 00:42 IST2014-07-12T22:06:24+5:302014-07-13T00:42:49+5:30

नाशिक : टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ. व्यंकटेश बांगवाड यांच्या जन्मदिन टेनिस व्हॉलीबॉल दिन साजरा केला जातो, त्यानिमित्त नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने येत्या १६ तारखेपासून ज्युनिअर, सबज्युनिअर गटाच्या मुला-मुलींच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धा यशवंत व्यायामशाळा येथे दोन दिवस खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेच्या ज्युनिअर गटात सहभागी होणारे खेळाडूंची जन्मतारीख १/१/९७ नंतरची तर सबज्युनिअर गटात सहभागी होणार्‍या खेळाडूंची जन्मतारीख १/१/९१ नंतरची असावी. सदर स्पर्धेतून जळगाव येथे होणार्‍या १६व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे. तरी जिल्‘ातील खेळाडूंनी यात सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, आनंद खरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Tennis Volleyball Tournament 16 | टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा १६ पासून

Web Title: Tennis Volleyball Tournament 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.