टेनिस स्पर्धेत अंशीत, भक्ती, आरुष, जिया, व्दिज, अनघा यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:57+5:302021-02-23T04:21:57+5:30
नाशिक : नासिक जिमखाना आयोजित टेनिस स्पर्धेच्या अंशीत देशपांडे, भक्ती ताजने, आरुष रौंदळ, जिया शहा, द्विज पाटील, अनघा ...

टेनिस स्पर्धेत अंशीत, भक्ती, आरुष, जिया, व्दिज, अनघा यांची बाजी
नाशिक : नासिक जिमखाना आयोजित टेनिस स्पर्धेच्या अंशीत देशपांडे, भक्ती ताजने, आरुष रौंदळ, जिया शहा, द्विज पाटील, अनघा यादव यांनी आपापल्या वयोगटातील स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एकूण १०७ प्रवेशिका आल्या असून, त्यामध्ये १०, १२ व १४ वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
१० वर्षांखालील मुलांच्या गटात आरुष रौंदळ याने अंतिम फेरीत सारंग पंचाक्षरी याचा ६-१ असा सहजरीत्या पराभव करून अजिंक्यपद मिळविले, तर मुलींच्या गटात जिया शहा हिने अंतिम फेरीत राघवी पाटीलचा ६-१ ने पराभव करून विजय मिळविला. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात द्विज पाटील याने अंतिम सामन्यात आराध्य मसदे याचा ६-३ असा अटीतटीच्या लढतीत पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले, तर मुलींच्या गटात अनघा यादव हिने अनिशा गनबहादूरचा ६-१ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अंशीत देशपांडे याने अंतिम फेरीत प्रणीत शेट्टी याचा ६-० असा सहजरीत्या पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपदाचा मान पटकावला तर मुलींच्या गटात भक्ती ताजने हिने अंतिम फेरीत जोविता अय्यर हिचा ६-४ असा पराभव करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. संस्थेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना चषक देऊन करण्यात आला. सूत्रसंचालन शेखर भंडारी यांनी केले. यावेळी नितीन मोडक, राधेश्याम मुंदडा, नितीन चौधरी, शेखर भंडारी, मिलिंद जोशी, झुलकर जहागीरदार, अभिषेक छाजेड, राकेश पाटील, सुनील भास्कर, संजय मराठे, जयंत कर्पे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन (२२ जिमखाना)
टेनिस स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसमवेत नरेंद्र छाजेड, नितीन मोडक, राधेश्याम मुंदडा, नितीन चौधरी, शेखर भंडारी, अभिषेक छाजेड, मिलिंद जोशी, झुलकर जहागीरदार, संजय मराठे व जयंत कर्पे आदी.