अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास दहा वर्षे सक्त मजुरी

By Admin | Updated: January 4, 2015 00:57 IST2015-01-04T00:56:57+5:302015-01-04T00:57:44+5:30

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास दहा वर्षे सक्त मजुरी

Ten years of hard labor wages for a minor child | अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास दहा वर्षे सक्त मजुरी

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास दहा वर्षे सक्त मजुरी

  नाशिक : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या युवकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली़ प्रशांत दिनकर धुळेकर, रा़ रविवारपेठ पंचवटी असे आरोपीचे नाव आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना २३ जानेवारी २०१४ मध्ये घडली होती़ अभोणा (ता़ कळवण ) येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस गिरणारे येथून धुळेकरने फू स लावून पळवून नेले होते़ तसेच तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला होता़ याबबात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार अभोणा पोलिसांनी धुळेकर यावर बालकांचे संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता़ हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी यांच्या कोर्टात सुरू होता़ आज बलात्कार या अरोपात सदर आरोपीस दहा वर्षांची शिक्षा व १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली, तर पीडित मुलीस १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले़ सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ सुप्रिया गोऱ्हे यांनी काम पाहिले़ या खटल्यात त्यांनी ८ साक्षीदार तपासले होते़

Web Title: Ten years of hard labor wages for a minor child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.