बालगृहातील पीडितेवर बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:11 IST2020-12-09T04:11:29+5:302020-12-09T04:11:29+5:30
पेठ तालुक्यातील कापुरझिरा गावात असलेल्या संचित मुलींचे बालगृह आहे. २०१५साली या बालगृहाच्या अधीक्षक कार्यालयात दिवाळीच्या निमित्ताने अल्पवयीन पीडित मुलीला ...

बालगृहातील पीडितेवर बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी
पेठ तालुक्यातील कापुरझिरा गावात असलेल्या संचित मुलींचे बालगृह आहे. २०१५साली या बालगृहाच्या अधीक्षक कार्यालयात दिवाळीच्या निमित्ताने अल्पवयीन पीडित मुलीला बोलावून घेत आरोपी अतुल याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. यानंतर पीडितेने बालगृहाच्या अधीक्षक असलेल्या सुशीला यांना ही बाब सांगितली असता त्यांनीसुद्धा तिची मदत करण्याऐवजी ‘तूच माझ्या मुलाच्या मागे लागली’, असे सांगून मारहाण करत शारीरिक-मानसिक त्रास दिला होता. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध ३७६ (क), (ड) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यानन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. सोमवारी (दि.७) खटल्याची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत परिस्थितीजन्य सबळ पुराव्यांच्याअधारे संशयित अतुल अलबाड व त्याची आई सुशीला अलबाड यांना दोषी धरले. त्यांना या गुन्ह्यात दहा वर्षांची सक्तमजुरी व वीस हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावत वेळीच न्यायालयात दाेषारोपपत्र सादर केले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला सहायक निरीक्षक कमलाकर यांनी केला.