अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: June 23, 2015 01:26 IST2015-06-23T01:25:46+5:302015-06-23T01:26:10+5:30
अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी
नाशिक : अल्पवयीन मुलीवर बळजबरी लैंगिक अत्याचार करून जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़ दीड वर्षांपूर्वी सुरगाणा तालुक्यात ही घटना घडली होती़ सुरगाणा तालुक्यातील सराड गावात राहणारा आरोपी सोमराज साहेबराव गवळी (२१) याने १५ जानेवारी २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ यानंतर सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार समोर आला़ या प्रकरणी मुलीच्या आईने ६ एप्रिल २०१४ रोजी सुरगाणा पोलीस ठाण्यात गवळी विरोधात गुन्हा दाखल केला होता़ हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके जोशी यांच्या जलदगती न्यायालयात सुरू होता़ सरकारी वकील सुप्रिया गोरे यांनी पाच साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले़ त्यावरून आरोपी सोमराज गवळी यास दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली़ (प्रतिनिधी)