शिष्यवृत्ती परीक्षेला दहा हजारांची दांडी

By Admin | Updated: March 22, 2015 23:41 IST2015-03-22T23:41:08+5:302015-03-22T23:41:15+5:30

शिष्यवृत्ती परीक्षेला दहा हजारांची दांडी

Ten thousand stalks for scholarship examination | शिष्यवृत्ती परीक्षेला दहा हजारांची दांडी

शिष्यवृत्ती परीक्षेला दहा हजारांची दांडी

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक परीक्षेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी दांडी मारली. या परीक्षेसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.
जिल्ह्यातील सर्व तालुके व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील परीक्षा केंद्रांमध्ये सदर परीक्षा घेण्यात आली. पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३९४ परीक्षा केंद्रांवर ७२,३३८ विद्यार्थी हजर होते, तर ७६०८ विद्यार्थी गैरहजर राहिले. तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४३,९३० विद्यार्थी उपस्थित होते, तर ३५७२ विद्यार्थी गैरहजर राहिले. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.
जिल्हास्तरावरून १५ तालुके व दोन महापालिका क्षेत्रात सदर परीक्षा घेण्यात आली. इयत्ता चौथीच्या म्हणजेत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्रत्येक परीक्षा केंद्रास एक केंद्र संचालक याप्रमाणे ३९४ केंद्रसंचालक होते, तर ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट असलेल्या केंद्रास एक उपकेंद्रसंचालकाची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रमाणे ३४ उपकेंद्रप्रमुख नियुक्त करण्यात आले होते. इयत्ता सातवीच्या म्हणजेच माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४२ केंद्रसंचालक, २५ उपकेंद्रसंचालक, २०६९ पर्यवेक्षक, ५९० शिपायांनी नियुक्ती करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Ten thousand stalks for scholarship examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.