माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याला दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:52+5:302021-09-24T04:16:52+5:30
भगूर येथील शारदा प्रकाश गायकवाड यांनी २८ मार्च २०१७ ते १३ सप्टेंबर २०१७पर्यंतची दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांची पिवळ्या रंगाच्या ...

माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याला दहा हजारांचा दंड
भगूर येथील शारदा प्रकाश गायकवाड यांनी २८ मार्च २०१७ ते १३ सप्टेंबर २०१७पर्यंतची दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांची पिवळ्या रंगाच्या (बीपीएल) शिधापत्रिकांबाबत माहिती मागितली होती. परंतु, तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा पुरवठा अधिकारी ए. डी. शेख यांनी त्यांना निर्धारित वेळेत माहिती दिली नाही. त्यामुळे गायकवाड यांनी राज्य माहिती आयुक्त खंडपीठाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ए. डी. शेख यांना नोटीस देऊन अपिलार्थी यांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य माहिती आयुक्तांनी १० हजार रुपये शास्तीच्या दंडाची कारवाई केली आणि त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करून माहिती अधिकार सेवा खात्यात जमा करण्याचा लेखी आदेश राज्य माहिती खंडपीठ आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी दिला आहे.