निळवंडीरोडला फोडली दहा दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 11:25 PM2021-09-13T23:25:39+5:302021-09-13T23:26:06+5:30

दिंडोरी : दिंडोरी शहरात गुरुवारी झालेल्या दुकाने फोडून झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच रविवारी निळवंडी रोडला दहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहे. हजारो रुपयाची चोरी करण्यात आली असून दुकानाचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रणतळ परिसरात टपरी फोडण्यात आली होती, तर दुचाकी ही चोरी गेल्याची घटना घडली आहे. सातत्याने होणाऱ्या घरफोड्यामुळे नागरिक व व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ten shops smashed on Nilwandi Road | निळवंडीरोडला फोडली दहा दुकाने

निळवंडीरोडला फोडली दहा दुकाने

Next
ठळक मुद्देदिंडोरीत घरफोडयांचे सत्र सुरूच : नागरिक व्यापाऱ्यांमध्ये घबराट

दिंडोरी : दिंडोरी शहरात गुरुवारी झालेल्या दुकाने फोडून झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच रविवारी निळवंडी रोडला दहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहे. हजारो रुपयाची चोरी करण्यात आली असून दुकानाचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रणतळ परिसरात टपरी फोडण्यात आली होती, तर दुचाकी ही चोरी गेल्याची घटना घडली आहे. सातत्याने होणाऱ्या घरफोड्यामुळे नागरिक व व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरातील निळवंडी रोडवरील स्वामी समर्थ कॉम्प्लेक्समधील कीटकनाशक व शेतीपयोगी औषधी दुकान, ऑटोमोबाईलस, एका दैनिकाचे विभागीय कार्यालय, वकिलांचे ऑफिस त्याचप्रमाणे इतरही दुकान फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून १४,७०० रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दुकानांमधील कॉम्प्युटर व इतर मुद्देमाल चोरी गेला नसला तरी देखील मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान करण्यात आले आहे.
दिंडोरी शहरात लागोपाठ घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून या घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे.

याबाबत व्यावसायिक सुनील पाटील यांनी दिंडोरी पोलिसात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक मोनिका जेजोट आदी पोलीस कर्मचारी करत आहे. (१३ दिंडोरी चोरी)

Web Title: Ten shops smashed on Nilwandi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.