भूसंपादनासाठी दहा प्रस्तावांना प्राधान्य

By Admin | Updated: September 21, 2014 00:29 IST2014-09-20T21:48:28+5:302014-09-21T00:29:47+5:30

भूसंपादनासाठी दहा प्रस्तावांना प्राधान्य

Ten proposals preferred for land acquisition | भूसंपादनासाठी दहा प्रस्तावांना प्राधान्य

भूसंपादनासाठी दहा प्रस्तावांना प्राधान्य


नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने भूसंपादनासाठी ४६ प्रस्ताव पाठविले आहेत. त्यापैकी दहा प्रस्तावांवर प्राधान्यक्रमाने सुनावणी सुरू आहे. एका रिंगरोडसाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे.
पुढील वर्षापासून कुंभमेळा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते, गटारी तसेच अन्य मूलभूत सुविधांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पालिका जलकुंभही बांधणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने विविध ठिकाणी भूसंपादन करण्यासाठी ४६ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडे पाठविले होते. त्यापैकी दहा प्रस्ताव प्राधान्यक्रमाने पूर्ण करावे, अशी पालिकेची मागणी होती. त्यात सहा प्रस्ताव रिंगरोडसाठी बाधीत रस्त्याचे होते, तर दोन प्रस्ताव शाहीमार्ग आणि दोन प्रस्ताव मलनिस्सारण केंद्रासाठी भूसंपादनाची प्रकरणे आहेत. एका रिंगरोडचे भूसंपादन करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
दरम्यान, पालिकेचे आणखी काही भूसंपादनाचे प्रस्ताव स्थायी समितीने आर्थिक कारणावरून रोखले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ten proposals preferred for land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.