मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 23:52 IST2021-11-29T23:51:08+5:302021-11-29T23:52:42+5:30

मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर्त्यांनी संप सुरूच ठेवल्याने या आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत १० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या निर्णयाने आतापर्यंत या आगारातील २० कर्मचारी निलंबित झाले आहेत.

Ten more employees of Manmad Depot suspended | मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित

मनमाड बस आगारात संपात सहभागी झालेले कर्मचारी.

ठळक मुद्देकारवाई : संप मात्र सुरूच ठेवण्याचा निर्धार

मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर्त्यांनी संप सुरूच ठेवल्याने या आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत १० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या निर्णयाने आतापर्यंत या आगारातील २० कर्मचारी निलंबित झाले आहेत.

एसटीचा संप सुरू असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही अशा गोरगरीब जनतेला बसत आहे. खासगी वाहतूकदाराकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. येथील बसस्थानकावर येऊन परत जावे लावत आहे. मात्र, खासगी वाहनधारकांकडून मनमानी भाडेवाढीने सर्वसामान्य माणूस एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे उभा असल्याचे चित्र समोर येत आहे. राज्यात इतर ठिकाणी संप मागे घेण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त येत आहे. मनमाड शहरात मात्र एसटी कामगारांनी एकजुटीने संप सुरूच ठेवला आहे. याआधी येथील १० जणांचे निलंबन केले होते, तर पुन्हा १० जणांचे निलंबन करण्यात आले आहे. आतापर्यंत २३८ कर्मचाऱ्यांपैकी २० कर्मचारी निलंबन झाले आहे.

निलंबनाचे आदेश नाशिक विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाले असून मनमाड आगारातील मागे १० आणि आता १० अशा २० कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे. निलबंनाची टागंती तलवार कर्मचाऱ्यांवर आहे.
- प्रितम लाडवंजारी, आगार प्रमुख, मनमाड

आमचं निलंबन झाले आहे. आमचे सर्व कर्मचारी निलंबित झाले तरी चालेल. मात्र, जोपर्यंत आमचे शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार.
- अरुण सांगळे, कर्मचारी.

Web Title: Ten more employees of Manmad Depot suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.