शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चप्पल घेण्यासाठी आई मोरीजवळ गेली अन्...; दहा महिन्याच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:15 IST

नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेनं तायडे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

Nashik Shocking News: नाशिकच्या देवळाली गावाजवळच्या रोकडोबावाडीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील दहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाळाचा खेळता खेळता रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोरीत पाण्याने भरून ठेवलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला. रोशन अजय तायडे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रोकडोबावाडी येथे संतोष यशवंत तायडे हे त्यांच्या कुटुंबासह एका लहानशा पत्र्याच्या घरात वास्तव्यास आहेत.  तायडे पितापुत्र हमाली करून उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी रात्री ९ वाजता तायडे कुटुंबीय घरात होते. रोहन व रोशन हे दोघे भाऊ मोबाइल बघत होते. रोशन खेळताना मोरीत गेला आणि तिथे बादलीत असलेल्या पाण्यात डोकावताना आत पडला. ही बाब लक्षात येताच अजय व संतोष तायडे यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रोशनच्या पश्चात आजोबा, आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण रोकडोबावाडी, देवळाली गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

...अन् आईने फोडला टाहो 

रोशनची आई अनिता या स्वयंपाक करत असताना काही सामान घेण्यासाठी त्यांच्या सासऱ्यांकडून पैसे घेऊन घराबाहेर पडत होत्या. यावेळी त्या चप्पल घेण्यासाठी मोरीजवळ गेल्या असता रोशन हा त्यांना बादलीत पालथा पडलेला दिसला. ते दृष्य पाहून या मातेने जोराचा टाहो फोडला. त्यांच्या आवाजाने सारेच खडबडून उठले अन् त्यांनी धाव घेत बादलीतून बाळाला बाहेर काढत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

मुलाचा मृत्यू ऐकून वडिलांचाही दुर्दैवी अंत

सावंतवाडी १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. १८ वर्षीय क्रिश संभया  हा तरुण ३ जून रोजी कारीवडे येथील धरणावर फोटो काढायला गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. क्रिशच्या निधनाची बातमी त्याचे वडील सेव्हिओ संभया यांना मोठा धक्का बसला. क्रिशच्या जाण्याचे दुःख सहन झाल्याने बुधवारी सकाळी सेव्हिओ यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू