एक मिनिटात दहा लाखांच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:42 IST2017-09-29T14:42:40+5:302017-09-29T14:42:46+5:30

Ten minutes of work approval in one minute | एक मिनिटात दहा लाखांच्या कामांना मंजुरी

एक मिनिटात दहा लाखांच्या कामांना मंजुरी


पंचवटी : कोणत्याच विषयावर चर्चा न करताच अवघ्या एक मिनिटात दहा लाख रूपयांच्या विविध विकास कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. पंचवटी प्रभागाची मासिक बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
प्रभागात विविध ठिकाणी टाकी भरण्यासाठी विद्युत पंप बसविणे, बोअरवेल करून विद्युत पंप बसविणे या कामांना विनाचर्चा सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आगामी कालावधीत दिपावली सण असल्याने संपुर्ण पंचवटी परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे, प्रभागात शेकडो पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबविणे, पथदीप दुरूस्ती करणे अशा सुचना सभापती माने यांनी संबंधित विभागाला दिल्या.

Web Title: Ten minutes of work approval in one minute