शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दहा लाखांचा मुद्देमाल जप्त : संत्री विक्रीचा बहाणा अन‌् गुदामावरच मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 18:09 IST

टाकळी येथून अगोदर अजीमला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन वाजीदच्याही वाळुंज गावातून मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने केला जबरी लुटीचा पर्दाफाशचोरीचा माल भंगार दुकानात

नाशिक : शहरात संत्री विक्रीचा बहाणा करत दाखल झालेल्या चोरट्यांनी परतीच्या प्रवासात सिन्नरमधील एक बॅटरीचे दुकान व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालाचे गुदाम लूटीच्या प्रकरणाचा छडा लावण्यास ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांच्या मुसक्या बांधत त्यांच्याकडून सुमारे १० लाख ५२ हजार ९९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, औरंगाबाद येथून नाशिकला आलेले संशयित अजिम बाहशहा शेख (४६, रा. टाकळी, ता. खुलताबाद), वाजिद रफिक चौधरी (२५, रा. वाळुंजगाव, औरंगाबाद) या दोघांनी सिन्नरमधे दोन दिवस मुक्काम ठोकतएका चारचाकी वाहनांना बॅटरी पुरविणारे दुकान व गुदामाची रेकी केली आणि मागील आठवड्यात मध्यरात्री सिन्नर शहरातील उद्योगभगवन व संगमनेरनाका परिसरातील अविनाश कॉर्बो लिमिटेड कंपनीचे गुदाम व न्यु इंडिया अ‍ॅटो इलेक्ट्रिक अ‍ॅड बॅटरीचे बंद दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. वाहनांचे इलेक्ट्रीक सुटे भाग, लोखंडी मोटर, विद्युत पंप, इलेक्ट्रीक मोटर, ग्राइंडर व्हील, वाहनांच्या बॅट‍ऱ्या, वेल्डींग वायरीचे बंडल असा १० लाख ५२ हजार ९९७ रुपयांचा माल चोरी करुन आयशर ट्रकमधून पोबारा केला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सचीन पाटील यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. यानुसार पथकाने चक्रे फिरविली. सहायक पोलीस निरिक्षक अनील वाघ, पोलीस नाईक प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, निलेश कातकाडे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे सापळा रचून टाकळी येथून अगोदर अजीमला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन वाजीदच्याही वाळुंज गावातून मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून घरफोड्यांचे विविध जिल्ह्यांतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.आंतरजिल्ह्यात टोळी सक्रीयसंशयित अजीम, वाजीद यांची आंतरजिल्ह्यात टोळी सक्रीय आहे. त्यांच्यावर आतापर्यंत औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांत घरफोडी, चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अन्य काही फरार साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्यात वापरलेला आयशर ट्रक (एम.एच.२० सीटी २६२१) पोलिसांनी जप्त केला आहे.-

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक